प्रभात डेअरीची दोघा कर्मचाऱ्यांनीच केली वीस लाखांची फसवणूक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहाता तालुक्यातील रांजणखोल शिवारातील श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर असलेल्या प्रभात डेअरीची २० लाख ७० हजार ३४८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राजकुमार चुनीलाल खंडेलवाल (रा. सूर्यनगर, बेलापूर रस्ता, वॉर्ड क्र. ७) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की डेअरीच्या खरेदी विभागातील व्यवस्थापक बापुसाहेब विनायक गायके (रा. गेवराई, ता. बीड) व त्याचा सहाय्यक आनंद वाघ (रा. रांजणखोल, ता. राहाता) या दोघांनी सन २०१४ ते २०१८ या कालावधीत संगणमत करून डेअरीची फसवणूक केली.

Loading...
 लेखापरीक्षणातून हा प्रकार समोर आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२७/१८ नुसार भारतीय दंड विधान कलम ४२०, ४०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.