श्रीगोंदा तालुक्यात जबरी चोरी,चोरांच्या मारहाणीत महिला गंभीर जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदा तालुक्यातील बांर्गाडा या गावात गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरांनी केलेल्या मारहाणीत विद्या सागर शेळके वय २३वर्षे ही महिला गंभीर जखमी झाली असून, या चोरीत सोन्या,चांदीचे दागिने,दोन मोबाईल असा एकूण २७,९००रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

श्रीगोंदा तालुक्यातील बांर्गाडा या ठिकाणी नंदुभाऊ विलासराव शेळके हे पत्नी मिनाबाई,सून विद्या व दोन वर्षांची नातीसह राहातात. शेळके यांची दोन मुले पुण्यातच राहातात. दि.१२ रोजी रात्री आठ वाजता श्रावणी सागर शेळके हिचा वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवन करून हे सर्वजण झापले.Loading...
पहाटे साडेपाच वाजता नंदूभाऊ शेळके यांना जाग आली. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु बाहेरून कुणीतरी कडी लावल्यामुळे दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेळके यांनी मोठमोठ्याने आवाज दिल्यानंतर त्यांच्या भाऊजई आशा यांनी दरवाजा उघडला. 

त्यानंतर शेळके पती पत्नी तातडीने बाहेर आले त्यांना बंगल्या समोर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच बंगल्याचा दरवाजाही उघडा दिसला त्यांनी आत जाऊन पाहिले असता. सर्व सामान अस्ताव्यस्त पडलयाचे व सुनबाई विद्या या बेशुद्धावस्थेत पलंगावर पडलेल्या दिसल्या. 


शेळके यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या उठल्या नाहीत. आपल्या घरी चोरी चोरी झाली असून, चोरांचा मारहाणीतच सुनबाई जखमी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी नगर येथे उपचारासाठी दाखल केले. गेल्यावर विद्या यांच्या डोक्याला आतील भागास मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


नंदूभाऊ विलासराव शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत. दरम्यान श्रीगोंदा पो निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.