विहिरीतील पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील वरुडी पठार येथील वर्षा विनोद जाधव (वय २७) या विवाहित महिलेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.१३ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

Loading...
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वर्षा जाधव ही महिला वरुडी पठार याठिकाणी राहत होती. ती शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्यावेळी तिचा पाय घसरुन विहिरीत पडली व विहिरीतील पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला आहे. 

याप्रकरणी संजय दगडू फटांगरे (रा.वरुडी पठार) यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजि.नं.४४/२०१८ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार हे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.