शरीरसंबंधास नकार दिल्याच्या रागातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घरखर्चासाठी माहेरून पैसे आणण्यास व शरीरसंबंधास नकार दिल्याच्या रागातून पत्नी सुनीता दादा गिते (वय ४०) व मुलगा शुभम दादा गिते (वय १२ वर्षे) यांचा कुऱ्हाडीने घाव घालून निघृर्ण खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डब्ल्यू हुड यांनी आरोपी दादा मारूती गिते (रा. थेरवडी, ता. कर्जत, जि. अ. नगर) याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


Loading...
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. केदार केसकर यांनी काम पाहिले.. या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील आरोपी दादा गिते याचा मयत सुनीता हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती. आरोपी दादा गिते हा पत्नी सुनीता हिला माहेरून घर खर्चासाठी पैसे आणावेत म्हणून त्रास देत होता. 

माहेरची परिस्थिती गरीबीची असल्याने तीने पैसे आणण्यास नकार दिला होता. तसेच २००३ साली आरोपीने व सासरच्यांनी वडिलोपार्जीत जमीन विकू नये म्हणून कर्जत येथील दिवाणी न्यायालयात मनाई हुकूमाचा दावा केला होता. दि. १०/४/२०१६ रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी दादा गिते याने मयत सुनिता हिच्यासोबत शरीरसंबंध करण्याची मागणी केली त्यास तीने नकार दिला. 


या रागातून आरोपीने रात्री ३.३० वा. सुमारास सुनीताच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला त्यावेळी ती जोरात ओरडल्याने मुलगा शुभम जागा झाल्याचे वाटल्याने तो सर्वांना सांगेल या भितीने शुभमच्या डोक्यात घाव घालून ठार केले. त्यानंतर तो फरार झाला. 


याबाबत मयत सुनीताचा भाऊ परशुराम ज्ञानोबा लटपटे (रा. बावी, ता. आष्टी, जि. बीड) याने कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास सहा. पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. 


या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डब्ल्यू हुड यांचेसमोर झाली. सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी परशुराम लटपटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. यादव, कर्जत भूमी अभिलेख कार्यालयाचे लिपीक श्रीराम बोरूडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.