खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयासमोर उद्या धरणे आंदोलन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर जिल्ह्यातील ईपीएस ९५ चे अल्प पेन्शनधारक त्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयासमोर रविवार (१५ जुलै) ला सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करणार आहेत. 

तसेच विविध मागण्यांचे निवेदन खासदार गांधी यांना देऊन लोकसभेच्या अधिवेशनात बाजू मांडण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे समन्वयक व महाराष्ट्र पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाषराव पोखरकर यांनी दिली. 

Loading...
ईपीएस पेन्शनधारकांना दरमहा ७ हजार ५०० रुपये व त्यावर निगडीत महागाईभत्ता एवढी कमीतकमी पेन्शन मिळावी. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये खासदारांनी पेन्शनर्सची बाजू संसदेत मांडावी यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

यासाठी जिल्ह्यातील वीज मंडळ, एस. टी. महामंडळ, साखर उद्योग, विडी उद्योग, सहकारी बँका, सर्व सहकारी संस्था आदी क्षेत्रातील सेवानिवृत्त पेन्शन धारक या आंदोलनात सहभागी होणार आहे.

यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नारायण होन, संपतराव समिंदर, दिलीप थोरात, साहेबराव वाघ, आशा शिंदे, बाळासाहेब चव्हाण, सुधाकर गुरव, मालती कोल्हे, मथुरा सोनवणे, दत्तात्रेय भोईटे आदींनी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.