नगर शहरात युवकावर कोयत्याने हल्ला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील सारसनगर भागातील कानडे मळा येथे हमालीचे काम करणाऱ्या एका युवकावर बुधवारी कोयत्याने वार करुन हत्येचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


Loading...
सारसनगर येथील भगवानबाबा मंदिराजवळ महेश रामदास पाखरे हा युवक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करुन परत येत असताना त्याच्यावर संशयित आकाश कोरे, रोहन शिंदे व अन्य तिघांनी कोयत्याने हल्ला केला. यात महेश गंभीर जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरुन भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.