विजेचा शॉक बसून दोन महिलांचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विजेचा शॉक बसून दोन महिलांचा मृत्यू झाला. पहिली घटना नेवासे तालुक्यातील नजीकचिंचोली येथे घडली. सरिता कडुबाळ ठोंबरे (३२) या शेतात गवत खुरपत असताना तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन जागीच मरण पावल्या. 

ही घटना गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. उसाच्या शेतात (दिघी शिवार गट नं ९२) रात्री विजेची तार तुटून पडली होती. सरिता यांच्या लक्षात न आल्याने त्या त्यात अडकून शॉक बसून मरण पावल्या. त्यांच्यामागे पती, सासू, दीर आणि ८ व ४ वर्षे वयाची २ मुले आहेत. शुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. Loading...
दुसरी घटना राहुरी तालुक्यातील चेडगाव येथे घडली. पिनिता विठ्ठल शिंदे (३२) या आदिवासी महिलेचा विजेचा शाॅक लागून घरकाम करत असताना जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली. पिनिताच्यामागे पती व चार मुले आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.