'त्या' लाभार्थ्यांची आमदार औटींकडूनच अडवणूक - निलेश लंके.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील गोरेगाव व हिवरेकोरडा येथील २१० ज्येष्ठ नागरिकांची मार्च २०१८ मध्ये संजय गांधी निराधार योजनेत सामावेश होवुनही त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. 

त्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी गुरूवारपासून लाभार्थ्यांना बरोबर घेत तहसील कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत.हिवरेकोरडाच्या लाभार्थांचा प्रश्न ग्रामसभेमध्ये मार्गी लागला असून, गोरेगावच्या राजकीय कुरघोडीतून हा प्रश्न कायम असून दुसऱ्या दिवशी हलक्या पावसात उपोषण सुरू होते. 


या लाभार्थ्यांना या योजनेचे अध्यक्ष आ.विजय औटी यांनीच राजकीय आकसापोटी मंजूर प्रकरणे चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणुनबुजुन पाठवल्याचा लंके यांनी केला.


त्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटले जोपर्यंत या दोन्ही गावच्या लाभार्थाच्या खात्यावर पैसे जमा होत नाही योपर्यत उपोषण न सोडण्याचा पावित्रा लंके यांनी घेतला आहे. कारण दोन्ही गावातील योजनेची प्रकरणे निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने व कार्यकर्त्यांनी केल्यानेच आ.औटी यांनी आक्षेप घेतल्याचा आरोप लंके यांनी केला आहे. 


Loading...
तर दुसरीकडे तहसीलदार भारती सागरे व पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे, पो.उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी गुरूवारी या विषयी लंके यांच्यासह उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. हिवरेकोरडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ही प्रकरणे मंजूर करण्याचा ठराव घेतला आहे. 

यासाठी योजनेचे नायब तहसीलदार राजेंद्र माळी व मंडलाधिकारी संतोष औटी यांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा घेवुन ही प्रकरणे तातडीने मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवून, त्यानंतर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल असेही तहसीलदार सागरे यांनी सांगितले.


परंतु गोरेगावला ग्रामसेवक नसून सरपंच ग्रामसभा लावत नसल्याने या दोघांवर कारवाई करावी. तसेच गोरेगावचे सरपंच ग्रामसभेचा प्रयत्न हाणून पाडत असल्याचा आरोप गोरेगाव येथील अभय नांगरे व संजय नरसाळे यांनी केला आहे..
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.