ऐनवेळची गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकर पीक विमा नोंदणी करावी -जिल्हाधिकारी द्विवेदी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये, असा प्रशासनाचा प्रयत्न असून शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यांत बैंकेत गर्दी करण्यापेक्षा आताच विमा उतरवावा आणि ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्‍हयातील अधिकाधिक शेतक-यांना पिक विमा योजना व पंतप्रधान विमा योजनेचा लाभ मिळावा व या योजनेत त्‍यांना सहभागी करुन घेण्‍यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा अग्रणी बैंकेमार्फत सर्व बैंकांना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सांगितले आहे. त्यासाठी संपर्क मोहिमही सुरु आहे. 


Loading...
मात्र,शेतकऱ्यांनी अंतिम तारखेपूर्वीच हा विमा भरणे आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. शेतीप्रधान जिल्हा असतानाही पीक विमा भरण्याचो प्रमाण नगण्य आहे. हे प्रमाण वाढविण्याची गरज असून शेतकऱ्यांना त्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. 

य़ा योजनेत विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै ही आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी करण्यापेक्षा आताच पीक विमा भरावा, असे आवाहन त्यांऩी केले. शेवटच्या दिवशी एकाच वेळी नोंदणी करताना यंत्रणेवर ताण येऊन सर्व्हर बंद पडणे, तांत्रिक दोष ऩिर्माण होणे, असे प्रकार घडतात. 

यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते आणि पीकविम्यापासून त्यांना वंचित राहावे लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन पीक विमा लवकरात लवकर भरावा,असे आवाहन श्री. द्विवेदी यांऩी केले आहे.

आपल्‍याकडे अद्यापही पंधरा दिवस आहेत. या शिल्लक दिवसात शेतकऱ्याऩी आतापासूनच त्यांच्या नजिकच्या खाते असलेल्या बैंकेत पीक विमा भरावा, असे त्यांऩी सांगितले. 


शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक विमा मिळवून देण्यासाठी आपण सर्व पिक विमा व पंतप्रधान विमा योजनेसंदर्भात उत्‍कृष्‍ट काम करु. त्यासाठी अंतिम टप्प्यांत नोंदणीचा वेग वाढवा अशा सूचना त्यांऩी बैंक आणि कृषी विभागाला दिल्या आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.