राहुरी तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी घडली. दोन दिवस मृत्यूशी झुंज देत बुधवारी दुपारी अखेर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी, कोल्हार खुर्द येथील अनिल रामभाऊ घोडेकर (वय ४५) यांची कोल्हार खुर्द येथे शेती असून लोकांकडून शेती खर्चासाठी घेतलेले पैसे फेडता न आल्याने तसेच शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळत नसल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली. 
Loading...

त्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना लोणी येथे प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.