मनपाच्या महिला कर्मचाऱ्यास मोकाट कुत्र्यांचा चावा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बुरुडगाव रोडवर गुरुवारी (दि. १२) सकाळी महापालिकेच्या सफाई कामगार असलेल्या चंद्रकला घोरपडे या महिला कर्मचाऱ्यावर परिसरातील मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्लयात महिलेच्या दोन्ही हातास कुत्र्यांनी चावा घेतल्याने सदर महिला जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


Loading...
नगर शहरासह उपनगरात मोकाट कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून अनेक नागरिक व जनावरांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना यापूर्वी घडली असून महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे. यापूर्वी विनायकनगर परिसर तसेच औरंगाबाद रोडवरील गजराजनगर परिसरात त्याचबरोबर मंगलगेट परिसरात अशा घटना घडलेल्या असून नागरीकांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.