लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी नीलेश लंके यांचे उपोषण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पारनेर तालुक्यातील गोरेगाव व हिवरेकोरडा येथील २१० लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च २०१८ मध्ये मंजूर असताना या लाभाथ्यांंर्चे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी लाभार्थ्यांसह पारनेर तहसील कार्यालयात गुरुवार, दि. १२ जून रोज़ी कार्यकर्त्यांसह उपोषण सुरू केले आहे. या वेळी नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

पारनेर महसूलच्या ३ मार्च २०१८ रोजी झालेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत निराधार श्रावणबाळ, विधवा परित्यक्ता, अपंग, असे एकूण २१९५ प्रकरणे आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्यापैकी २०९३ प्रकरणे मंजूर झालेली आहेत. यातील गोरेगाव व हिवरे कोरडा येथील मंजूर प्रकरणे असतानाही या या दोन गावांतील गावांतील लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. 
Loading...

तालुक्यातील काही पुढाऱ्यांनी राजकीय सूडबुद्धीने या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याने हे लाभार्थी अनुदानपासून वंचित राहिले असल्याचा आरोप नीलेश लंके यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले आहे. गोरेगाव व हिवरे कोरडा ही दोन गावे दुष्काळी असून, अनुदान मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नीलेश लंके यांनी दोन्ही गावांतील लाभार्थ्यांसह उपोषण सुरू केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.