केडगाव दुहेरी हत्याकांड ८ आरोपींना आज कोर्टात सुनावणीसाठी हजर करणार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केले आहे. आज शुक्रवारी (दि. १३) या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलेल्या आठ आरोपींना सुनावणीसाठी नगरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

केडगाव मनपा निवडणूक निकालाच्या दिवशी शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात आ. जगताप यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली. दि. ६ जुलै रोजी सीआयडीचे तपासी अधिकारी अरुणकुमार सपकाळे यांनी आठ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्रामध्ये आ. संग्राम जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांची नावे समाविष्ठ करण्यात आली नाहीत. 

Loading...

गुन्हा घडल्यापासून ९० दिवस आरोपी न्यायालयीन कोठडीत होते त्यांची नावे दोषारोपपत्रात नाहीत. सीआरपीसी १७३(8) अन्वय अतिरिक्त पुरावा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. दरम्यान दोषारोपपत्रात नाव नसल्याने त्यांना जामीन देणे कायदेशीर असल्याने आ. जगताप व बाळासाहेब कोतकर यांना जामीन मंजूर करण्यात आला. 


दरम्यान दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणीसाठी शुक्रवारी (दि. १३) तारीख ठेवण्यात आली असून यातील आरोपी भानुदास एकनाथ कोतकर, संदिप रायचंद गुंजाळ, नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर, रविंद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर उर्फ बी. एम., संदिप उर्फ जान्टी बाळासाहेब गिऱ्हे आणि महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे यांना हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर सदरचा खटला सुनावणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येईल.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.