जातपंचायत मारहाण प्रकरण ६६ जणांवर गुन्हा दाखल ; सात आरोपीना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा कारखाना येथील जोशी वस्तीवरील जातपंचायतीचे मोबाईलमध्ये व्हिडीओ घेण्याच्या कारणातून दोन गटात तुफान मारामारी झाली. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून, याप्रकरणी तब्बल ६६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading...
बुधवार दि.११ रोजी ढोकराई माळावर जात पंचायतीच्या बैठकीचा एकजण मोबाईलवर व्हिडीओ शूट करत होता. त्याला विरोध केल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारामारीत २० जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी बायडाबाई भीमा फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या नातेवाईकासोबत बैठक सुरु असताना अनिल गायकवाड हा त्याचे शुटिंग करत होता. त्याला विरोध केल्याचा राग आल्याने आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवत मारहाण केली. त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदा जमाव जमविने, दंगल, आर्म ॲक्ट आदी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

तर रंगू गंगाराम पालवे यांनी दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे. की, आमच्या घरासमोर जात पंचायतीची बैठक बसली होती. नेमके काय चाललं आहे, हे पाहण्यासाठी अनिल पालवे हा गेला असता. जमावाने दगडफेक करत मारहाण केली.

त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल घडवने, तसेच आर्म ॲक्टचे कलम ४,२५ , बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ७,८ नुसार, त्याचबरोबर विनयभंग आदि कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.