द्वारकामाईत साईबाबांचा चमत्कार की साक्षात्कार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य। नित्य घ्या प्रचिती आनुभवे।।'' या साईबाबांच्या वचनाचा साईभक्तांना प्रत्यक्षात पुन्हा एकदा अनुभव आला आहे. बुधवारी (दि. ११ जुलै) मध्यरात्री द्वारकामाईत साईंची प्रतिमा प्रकटल्याने भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. साईबाबांचा हा चमत्कार की साक्षात्कार याबाबत साईभक्त व नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

समाधी घेतल्यानंतर शंभर वर्षानंतरही साईबाबांचं अस्तित्व व प्रचिती कायम आहे. फक्त 'श्रद्धा व सबुरी' या बाबांच्या शिकवणुकीवर विश्वास हवा. असे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले. साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचं वास्तव्य द्वारकामाई मशिदीत घडलं. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे सर्व भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्य साधारण महत्त्व आहे. Loading...
याच द्वारकामाईत बाबांनी पाण्यावर दिवे लावून आपला चमत्कार घडविला होता. बुधवारी शेजारतीनंतर रात्री द्वारकामाईत जिथे बाबा सतत बसायचे त्या भिंतीवर अचानक साईबाबांचा चेहरा असलेली प्रतिमा दिसली. साईंच्या या प्रतिमेचे दर्शन बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० पर्यंत असे तासभर घडले. सोशल मिडियावर याचे छायाचित्र व माहिती प्रसारित झाल्याने गर्दीत मोठी भर पडली. 

अलोट गर्दी द्वारकामाईत झाल्याने भक्तांना आवरणे सुरक्षा विभागाच्या आटोक्याबाहेर गेले. अनेकांनी मोबाइलमध्ये फोटो व शुटिंग काढण्यासाठी मोठी धावपळ केली. साईनामाच्या जयघोषाने द्वारकामाई दुमदुमून गेली होती.. सन २०१७-१८ साई समाधी शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. शताब्दीनिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


शताब्दीचे शेवटचे १०० दिवस शिल्लक असताना बाबांनी साक्षात भक्तांना पुन्हा आपले दर्शन देत आजही माझे अस्तित्व व प्रचिती कायम असल्याचा साक्षात्कार घडविला आहे. 'नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य। नित्य घ्या प्रचिती आनुभवे'' या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव भक्तांना आला आहे. गुरुवारी सकाळीही द्वारकामाईत नेहमीपेक्षा अधिक मोठ्या रांगा लागल्या होत्या.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.