श्रीरामपूरमध्ये रेल्वेचा धक्का लागून रेल्वे पोलिसाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रेल्वे रुळावर पेट्रालिंग करत असताना एका आर.पी.एफ.च्या जवानाचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला. काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास बेलापूर ते चितळी स्थानकांदरम्यान ही घटना घडली. एन. बी. दौंड असे ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 


Loading...
दौंड हे सहकाऱ्यांसमवेत बेलापूर ते चितळीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी अचानक आलेल्या रेल्वेचा त्यांना धक्का बसला. यात ते जागीच ठार झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.