पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या शतकाच्या बळावर भारताचा दणदणीत विजय.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कुलदीप यादवने आपल्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ गोलंदाजी केल्यानंतर रोहित शर्माच्या १८व्या दमदार शतकाच्या बळावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने भारतासमोर ठेवलेले २६९ धावांचे आव्हान भारताने ४०.१ षटकांमध्ये केवळ २ गडी गमावत पार करत सहज विजय मिळवला. 

Loading...
सामन्यात सलामवीर रोहित शर्माने सर्वाधिक १३७ धावा केल्या. रोहितचे वनडे क्रिकेटमधील हे १८वे शतक आहे. कर्णधार विराट कोहलीने ७५ तर, शिखर धवनने ४० धावांचे योगदान दिले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरू झालेला इंग्लंडचा डाव ४९.५ षटकांमध्ये संपुष्टात आला. इंग्लंडने २६८ धावा केल्या. इंग्लंडसाठी बटलरने ५३ धावा केल्या. चमकदार कामगिरी करत भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याने ६ बळी घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.