तंबाखू खाताना आढळल्याने पोलिसाने केली खिडकीची सफाई.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात 'वारंट' बजावण्यासाठी आलेला पोलिस कर्मचारी तंबाखू खाताना आढळल्याने न्यायालयाने त्याला खिडकी सफाईचे आदेश दिले. तसेच याबाबत पोलिस अधिक्षकांना कळविल्याचे समजते. या प्रकाराने न्यायालय परिसरात धुम्रपान करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. या प्रकाराची दिवसभर न्यायालय परिसरात चर्चा सुरु होती. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरच्या पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी जिल्हा न्यायालयात वॉरंट देण्यासाठी गेले असता त्यांच्या तोंडात तंबाखू आढळली. याबाबत कोर्टाने संबंधीत पोलिस कर्मचारी यांचेकडे विचारणा केली असता त्याने तोंडात तंबाखू असल्याची कबुली दिली. धुम्रपान बंदी असल्याची समज कोर्टाने त्याला दिली अन् खिडकी सफाईचे आदेश दिले. Loading...
तसेच याबाबत न्यायालयाने पोलिस अधिक्षकांना कळविल्याचे समजते. हा प्रकार बुधवारी (दि. ११) दुपारी जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये घडला. . जिल्हा न्यायालयाची नवीन चार मजली इमारत पोलिस अधिक्षक कार्यालय चौकाजवळ उभारण्यात आली आहे. 

न्यायालय परिसरात तंबाखू, गुटखा, मावा खाण्यास, बिडी, सिगारेट ओढण्यास मनाई असताना अनेकजण तेथे धुम्रपान करतात. इमारतीच्या खिडक्यामधून थुंकतात त्यामुळे इमारतीच्या खिडक्यांचे, भिंतींचे विद्रुपीकरण होत आहे. न्यायालयाने पोलिस कर्मचाऱ्यालाच इमारतीच्या खिडक्या साफ करायची शिक्षा दिल्याने आता धुम्रपान करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. या प्रकाराची दिवसभर न्यायालय परिसरात चर्चा सुरु होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.