दारू पाजण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद रोडवरील पांढरी पूल येथील लिलियम पार्कजवळ हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर दारु पाजण्यास नकार दिल्याचा राग येऊन खोसपुरी येथील तरुणास चौघांनी हॉकी स्टीक व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. 

ही घटना रविवारी (दि. १) रात्री साडेदहा वाजता घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैभव प्रकाश भालेराव (वय २५, रा. खोसपुरी) याला भेटण्यासाठी त्याच्या मामाचा मुलगा आला. 
Loading...

त्याच्यासोबत निखिल गौतम मेढे (रा. भिंगार) हा देखील आला. तिघे मिळून जेवण करण्याकरिता हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी निखिल मेढे याने वैभव यास मला दारू प्यायची आहे मला दारू आण असे म्हणाला. त्यावर वैभव याने मी दारू पित नाही असे सांगितले. 

याचा राग येऊन निखिल याने वैभव यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्याच्या ओळखीचे भिंगार येथील अक्षय मेढे, अनिकेत भिंगारदिवे व एक अनोळखी इसम यांना बोलावून घेत चौघांनी वैभव यास हॉकीस्टीक व लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत वैभव जखमी झाला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. व्ही. पालवे हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.