संगमनेरात शहर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील मालदाड रोड येथे अवैधरित्या चालणाऱ्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकल्याची घटना मंगळवार दि. ११ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. एकूण १३ हजार १७० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले असून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालदाड रोड याठिकाणी अमोल सुभाष म्हस्के, विजय सुरेश गुंजाळ, साहेबराव राजु पवार, धिरज विनोद कळसकर, मनोज अण्णा पवार, लखन मारुती शिंदे, शुभम हिरामन शिंदे, साईनाथ अजमलंग शिंदे, निलेश हरिभाऊ टोपे, प्रविण राजेंद्र गायकवाड, गोविंद लकप्पा दासरी, नयन राजेंद्र मुर्तडक, विनोद भास्कर शिरसाठ, शरद विठ्ठल शिंदे, कृष्णा राजेंद्र भडांगे हे अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत प्रभारी पोलिस निरीक्षक अभय परमार यांना समजली. Loading...
माहिती समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात एकूण १३ हजार १७० रुपये रोख रक्कम व जुगारीचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील १५ जणांवर मुंबई जुगार ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्र.पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बाळासाहेब अहिरे हे करत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.