नगर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पुणे महामार्गावर जगताप हॉटेल समोर सोनेवाडीकडून चासकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ७) रात्री साडेआठ वाजता घडली. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल काशिनाथ कार्ले (रा. चास, ता. नगर) हा त्यांची प्लेझर मोपेड मोटारसायकलवरून सोनेवाडीहून चासकडे जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जगताप हॉटेलसमोर कांबळे मळयाजवळ त्याला धडक दिली. या धडकेत राहुल हा गंभीर जखमी झाला. अपघात होताच अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. 

घटनास्थळाजवळील नागरिकांनी राहुल यास औषधोपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. औषधोपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी संतोष काशिनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.