नगरकरांसाठी नवी झेप घेईल - आमदार संग्राम जगताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहराच्या विकासावर चर्चा सुरू करून प्रत्यक्षात विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नगरकरांनी माझ्यावर केलेले प्रेम आता दिसून येत आहे. गेली ३ दिवस नगर शहरातील जनता मोठ्या प्रमाणात भेटत आहेत. नगरकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. 

नगर शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपतीचे दर्शन घेऊन शहराच्या विकासाचे प्रश्­न सोडविण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तमाम नगरकरांच्या प्रेमामुळे यशाची नवी झेप घेण्याचे बळ मला मिळाल्याची भावना आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी व्यक्त केली. 
Loading...

शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी दर्शन घेतले. यावेळी मित्रपरिवारातर्फे श्रीफळांचा नवस फेडून आरती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.. जगताप म्हणाले, 'शहरातील मित्र परिवार व जनतेने माझ्यावर आलेल्या संकटाच्या काळात अनेकांनी साथ दिली. 

अनेकांनी देवाचा धावा केला. प्रार्थना केल्या, नवस केले. या सवार्र्ंचा मी मनापासून ऋणी आहे.' श्री विशाल गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.