संगमनेरमध्ये दीड कोटींची मर्सिडीज बेन्झ कार जळून भस्मसात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारातून जाणाऱ्या पुलाजवळ आज पहाटे साडेचारच्या सुमारास इंजीनमधील शॉर्ट सर्किटमुळे महागडी कार जळून भस्मसात झाली.सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही.

Loading...
घटना झाल्यानंतर तातडीने या बाबत महामार्ग प्रशासनाला माहिती देवूनही फायरब्रिगेडची गाडी सकाळी साडेसात पर्यंत घटनास्थळी पोहोचली नाही.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वारिस खान, त्यांचे स्विय सहाय्यक व चालक असे तिघे नाशिककडून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली. मर्सिडीज बेन्झ एस क्लासची सुमारे एक कोटी साठ लाखांची कार डोळ्यासमोर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना हताश होवून पहाण्याशिवाय खान यांच्या हाती काहीच नव्हते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.