...म्हणून सोनाली बेंद्रेला झाला हाय ग्रेड कॅन्सर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यामुळे ती सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी बॉलिवूड मधील कलाकारांनी तिच्यासाठी प्रार्थना केलीय. मात्र सोनालीवर ही वेळ तिच्याच निष्काळजीपणामुळे आल्याचं स्पष्ट झालं आहे.  

आपल्याला उद्भवणाऱ्या दुखण्यावर तिने वारंवार दुर्लक्ष केलं आणि आता अशी वेळ आली आहे की ती कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर पोहचली आहे. कॅन्सरच्या लक्षणामुळे गेले काही दिवस तीचं अंग वारंवार दुखत होतं. मात्र तीने त्याकडे कायम दुर्लक्ष केलं. 

तिच्या याच दुर्लक्षामुळे कॅन्सरने शेवटची स्टेज गाठल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान इतकी आजारी असतानाही तिने अनेक टीव्ही शो केले आणि स्वत:ला कामातच व्यस्त ठेवलं. पण यावर वेळेतच काळजी घेतली असती तर सोनालीला आज हा दिवस बघायला लागला नसता. 
Loading...

दरम्यान, सोनालीचे आजारासंबंधिचे पोस्ट वाचल्यावर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमधील कलाकारांपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच तिला लवकराच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनालीनेही तिला शक्य तितक्या ट्विटना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.