महिलेच्या गळ्यातील दोन लाखांचे दागिने धूमस्टाईल लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाहुण्यांच्या विवाहासाठी कोल्हार खुर्द येथे आलेल्या तळेगाव दिघे येथील महिलेच्या गळ्यातील २ लाख किमतीचे सुवर्णालंकार मोटरसायकलीवर आलेल्या दोघा भामट्यांनी धूमस्टाईल लांबवल्याने खळबळ उडाली. राधाराम मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. 


Loading...
तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथील दिघे कुटुंब मंगल कार्यालयात आले होते. सीमा अशोक दिघे कारमधून उतरून मंगल कार्यालयाच्या दिशेने जात होत्या. अशोक दिघे कार पार्क करत होते. तेवढ्यात काळ्या रंगाच्या मोटरसायकलीवर पाठीमागच्या बाजूने आलेल्या दोघा भामट्यांनी सीमा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, राणीहार ओरबडून पोबारा केला. सीमा यांनी आरडाओरडा केला, पण भामटे शिर्डीच्या दिशेने पसार झाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.