मोबाईल चोरास एक वर्ष सक्तमजुरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तरुणी मोबाईलवर संभाषण करीत असताना तिच्या हातातून मोबाईल चोरणाऱ्या चोराला राहाता न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. योगेश रामदास विटणोर (वय २१, रा. कुरणपूर, ता. श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव आहे.

Loading...

लोणी येथील पी.एम.टी. कॅम्पसमध्ये दिव्या मनोज गायतोंडे (वय २२) ही तरुणी आपल्या आयफोन मोबाईलवर आपल्या आईशी बोलत होती. यावेळी तिच्या हातातून विटणोर फोन घेऊन पळाला. यावेळी पोलीस व सुरक्षारक्षकांनी त्याचा पाठलाग केला. तो परिसरातील दाट झाडांमध्ये लपून बसलेला होता. सकाळी त्याला सुरक्षारक्षकांनी शोधून काढले. याच्याकडे ६० हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून आला. 


याप्रकरणी राहाता न्यायालयाने त्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस नाईक मधुसूदन दहिफळे, हेड कॉन्स्टेबल सोमासे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे ॲड. ए. ए. रंगरेज यांनी काम पाहिले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.