पैसे आणण्यासाठी गेलेली व्यक्ती बेपत्ता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सासुरवाडी येथील पाहुण्यांकडे उसने दिलेले पैसे आणण्यासाठी गेलेले सुभाष चव्हाण काहीही न सांगता निघून गेले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात सुमन चव्हाण यांनी बेपत्ता सुभाष चव्हाण यांचा शोध होण्यासाठी अर्ज दिला आहे. रविवारी (८ जुलै) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. 


Loading...
सुभाष यांचा रंग गोरा, दाढी वाढलेली, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पँट आहे. उंची ५ फूट २ इंच आहे. याबाबत माहिती मिळाल्यास नगर तालुका पोलिस ठाण्यात ०२४१-२४१६१२२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.