महापालिकेच्या उदासिन कारभारामुळे शहर बस अद्यापही कागदावरच.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या ढिसाळ कारभारमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून शहर बससेवा (एएमटी) बंद पडली आहे. निविदा पे निविदा काढण्यात आल्या. आता रॉयल्टीची रक्‍कम जास्त देणाऱ्या संस्थेची निवड करण्यात आली. परंतु तो स्थायी समितीकडे पाठविण्यास विलंब होत असल्याने ही शहर बससेवा कधी सुरू होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 

महापालिकेच्या उदासिन कारभारमुळे नगरकरांचा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मनस्तापासह आर्थिक झळ नगरकरांना बसत आहे. याकडे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.शहर बससेवा बंद पडून अडीच महिने झाले तरीही नव्याने बससेवा सुरू होऊ शकलेली नाही. महापालिकेने दोन वेळा निविदा काढल्या. त्यात दुसऱ्या निविदेला प्रतिसाद मिळाला. 

Loading...
जास्त रॉयल्टी देणारी संस्थेची निवड करण्यात आली आहे. दीपाली ट्रान्स्पोर्टची निविदेची निवड केली असून या संस्थेबरोबर वाटाघाटी देखील झाल्या आहेत. या संस्थेने वाटाघाटीचे पत्र महापालिकेला दिल्यानंतर तो प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात येणार आहे. या सोपस्कारला किती वेळ किंवा किती दिवस लागणार हे संबंधित अधिकाऱ्याला माहिती नाही. त्यामुळे शहर बससेवा सुरू होण्याची शक्‍यता सध्या तरी दुरापस्त झाली आहे.

सध्या तरी नगरकरांना रिक्षाचालकांच्या अरेरावी अन्‌ अवाजवी आकारण्यात येणाऱ्या भाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बस सेवा बंद पडल्याने रिक्षा चालकांची चांदी झाली असून प्रवाश्‍यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट सर्रास सुरू आहे. त्यात 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. उपनगरातील नागरिकांसाठी बससेवा महत्वाची आहे. कारण रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविण्यात येतात. परिणामी महिलांना रिक्षाने प्रवास करणे अवघड होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.