चार्टर्ड अकौटंटच्या नावे सोशल मीडियात बनावट खाते केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील एका चार्टर्ड अकौटंटच्या नावे इन्स्टाग्रामवर फोटोसहीत बनावट अकाउंट तयार केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील बुरुडगाव रोडवरील सुरज आदर्श कॉलनीत राहणारे चार्टर्ड अकौटंट गौरव अशोक पितळे (वय ३१) यांच्या नावाचे इन्स्टाग्रामवर फोटोसहीत बनावट खाते असल्याचे त्यांना आढळले. 

Loading...
त्या अकाऊंटला फेसबुकवरील प्रोफाईल फोटोचा वापर करण्यात आला होता. या बनावट खात्यावरुन बदनामीकारक मजकूर प्रसारीत होऊ नये यासाठी पितळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनिल पवार हे तपास करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.