पारनेर तहसीलच्या तक्रारींचा सोशल मीडियावर पंचनामा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तहसील कार्यालयाबाबत नागरिकांच्या असलेल्या तक्रारींचा येथील तरुणांनी सोशल मीडियावर ऑनलाईन पंचनामा केला आहे. या तक्रारींमध्ये तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामाची पद्धत, बोलण्याची भाषा, अधिकाऱ्यांचा रुबाब आदींचा समोवश आहे. 

Loading...
पारनेर येथील प्रवीण प्रभाकर औटी आणि त्यांच्या सहकारी तरुणांनी तहसील कार्यालयात फिरून या कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. पिण्याच्या पाण्याची सोय, स्त्री-पुरूष स्वछतागृह, कचऱ्याचा प्रश्न, अपंगांच्या समस्या, आदी समस्या समोर आणल्या. 

पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था- कोणतही सरकारी कार्यालयात नागरिकांना बसण्याची व्यवस्था असते, मात्र, पारनेर तहसील म्हणजे यास अपवाद आहे, देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा नारा दिला असतानाही तहसील कार्यालय कचराडेपो बनले असल्याचे दिसते. 

तहसील कार्यालय प्राथमिक सुविधासुद्धा नागरिकांना पुरवायला कमी पडत असल्याने पारनेर तहसील कार्यालयात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलच्या अधिकाऱ्यांना येथे येणाऱ्या नागरिकांच्या प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची खंत प्रवीण औटी यांनी या वेळी व्यक्त केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.