नगर जामखेड रस्त्यावरील आठवड घाटात कंटेनर उलटला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जामखेड रस्त्यावरील आठवड घाटातील एका वळणाचा कंटेनर चालकाला अंदाज न आल्याने २९ रोजी पहाटे ए.पी १६ टी.के ११७८ हा हैद्राबादकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर या घाटात उलटला.


Loading...
 या अपघातात कंटेनरमध्ये चालक व क्लिनर हे दोघेही वाहनातच अडकुन पडले होते.मात्र या अपघाताबाबत चिचोंडी पाटीलचे उपसरपंच शरदभाऊ पवार, नगर तालुका पोलिस स्टेशनचे पो.कॉ.बाप्पुसाहेब फोलानी, पोलिस पाटील संतोष खराडे, आठवड गावचे ग्रामपंचायत सदस्य शरद मोरे, अशोक चोभे यांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. 

यावेळी पाटोदा येथील मेजर गणेश चांगदेव खाडे व मेजर बापू अलकुशे यांनीही घटनास्थळी थांबून मदत केली. कंटेनरमध्ये अडकलेले चालक व क्लिनरला बाहेर काढणे अशक्य होते.त्यामुळे शेवटी क्रेन व जेसीबी मशीनच्या साह्याने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.