विजेच्या धक्क्याने राहुरीत एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील धामोरी बु.येथील रहिवासी नारायण रामभाऊ कुदळे (वय ५८) यांना तुटलेल्या विजेच्या तारेचा झटका बसल्याने ते जागीच गतप्राण झाले.


Loading...
मुळचे भेर्डापूर (ता.श्रीरामपूर) येथील असलेले आता पत्नी व मुलीसह धामोरी बु. येथे राहत असलेले नारायण कुदळे हे परीघाबाई दुधाट यांच्या गट नं. १६५/२ मध्ये जनावरांसाठी गवत घेत असताना त्यांचा महावितरणाच्या तुटलेल्या विजेच्या तारेला हात लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

सदर घटनेला दोन दिवस उलटून गेल्याने त्यांचे संपूर्ण शरीर कुजून गेले होते. राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस कॉन्सटेबल बी.आर. चव्हाण, सुशांत दिवटे करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.