निळवंडे कालव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेणार - ना.विखे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निळवंडे प्रकल्पांतर्गतची अकोले तालुक्यातील २२ किलोमीटर कालव्यांची कामे होणे गरजेचे आहे. निळवंडे धरणाच्या मुखातून बंदिस्त जलवाहिनीने पाणी नेणे अशक्य आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी व घुलेवाडी या ठिकाणी भूसंपादन बाकी आहे. अकोलेतील निळवंडे कालव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेवून शंकांचे निरसन करू, अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Loading...

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील घोडमाळवस्ती येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. शरद थोरात, नामदेव दिघे, किसन दिघे, ज्ञानदेव दिघे, गोरख दिघे, अशोक इल्हे, प्रकाश दिघे, पंढरीनाथ इल्हे, सुनील दिघे, रामदास दिघे, गोविंद कांदळकर, सुभाष गोडगे, सुभाष दिघे, शिवाजी सुपेकर, डॉ. आर. पी. दिघे, भीमराज दिघे, कॉ. अमोल दिघे, संजय कदम, राहुल जगताप, अशोक दिघे, सचिन गायकवाड, संजय कांदळकर, शिवाजी दिघे, रविंद्र दिघे, मच्छिंद्र दिघे, दत्तात्रय दिघे, बाबासाहेब दिघे, बशीर शेख, सुधीर दिघे, मयूर दिघे उपस्थित होते.


ना.विखे पाटील म्हणाले, कोपरगाव शहराला दारणा धरणाचे पाणी आरक्षित असून त्यांनी निळवंडेचे पाणी मागणे योग्य नाही. अकोले तालुक्यात कालव्यांची कामे प्रलंबित आहेत, तशी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी व घुलेवाडी याठिकाणी भूसंपादन बाकी आहे. 


त्यासाठी खा. सदाशिव लोखंडे यांनी प्रयत्न करावेत. नुसतेच हारतुरे घेवू नयेत. निळवंडेतून संगमनेर शहरासाठी आणलेल्या जलवाहिनीतून तळेगाव प्रादेशिक योजनेला पाणी मिळण्यासाठी लाभार्थी गावांच्या ग्रामपंचायतींचे ठराव घ्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. 

याप्रसंगी विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील यांच्यासमोर ग्रामस्थांनी तळेगाव प्रादेशिक योजना, आणेवारी, पीकविमा, गावठाण हद्दवाढ, मांस भरलेल्या ट्रक जळीतप्रकरणी दाखल गुन्हे यांसह विविध समस्या मांडल्या. त्यावर या समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली. 


याप्रसंगी डॉ. आर. पी. दिघे, रामदास दिघे, भीमराज दिघे, नामदेव दिघे, कॉ. अमोल दिघे यांनी समस्या व व्यथा मांडल्या. यावेळी ना.विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश दिघे यांनी केले. सुनील दिघे यांनी आभार मानले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.