शेवगाव रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्राचार्य दिलीप फलके तर सेक्रेटरी पदी मनिष बाहेती यांची निवड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी शाखेच्या अध्यक्षपदी रेसिडेन्सिअल विद्यालयाचे प्राचार्य दिलीप फलके यांची तर सेक्रेटरीपदी गोदावरी उद्योग समुहाचे प्रमुख मनिष बाहेती यांची तर इनरव्हील क्लब, शेवगावच्या अध्यक्षपदी लिना सबलोक व सेक्रेटरी पदी यांची डॉ. मनिषा लड्डा यांची निवड झाली आहे.
शहरातील स्वराज मंगल कार्यालयात गुरूवारी ( दि. १२ ) सायंकाळी ६ वाजता रोटरी क्लब व इनरव्हीलच्या नुतन पदाधिका-यांच्या पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत असून भिका-यांसाठी सामाजिक कार्य करणारे डॉ. अभिजित सोनवणे ( पुणे ) व सोहम ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. मनिषा सोनवणे यांच्या हस्ते नुतन पदाधिकारी पदग्रहण करतील. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल विष्णू मोंढे, सहप्रांतपाल उद्धव शिरसाठ उपस्थित राहणार आहेत.

रोटरी क्लबच्या ही आंतरराष्ट्रिय संघटना असून शेवगाव येथील शाखेची स्थापना तीन वर्षांपुर्षी झाली होती. मागील तीन वर्षांत रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. रोटरीच्या खजिनदारपदी बबनराव म्हस्के यांची निवड झाली आहे. तर इनरव्हीलच्या खजिनदार पदी भाविका आर्य यांची तसेच आयएसओ पदी अश्विनी गवळी यांची निवड झाली आहे.

रोटरीच्या समाजोपयोगी कार्याचा वसा वृद्धींगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सर्वांच्या सहकार्याने रचनात्मक सामाजिक काम करण्याचा संकल्प रोटरीचे नुतन अध्यक्ष प्राचार्य दिलीप फलके व सेक्रेटरी मनिष बाहेती तसेच इनरव्हीलच्या शखाध्यक्ष लिना सबलोक व डॉ. मनिषा लड्डा यांनी यांनी व्यक्त केला आहे. 

पदग्रहण समांभासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष भागनाथ काटे , सचिव डॉ. दिनेश राठी, इनरव्हील क्लबच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. प्रिती राठी व सचिव वसुधा सावरकर यांनी केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.