पारनेर तालुक्यात टँकर व टेम्पोच्या अपघातात तीन जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील नगरकडे जाणाऱ्या एस.के.आर. चौकात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दुधाचा टँकर व मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक होऊन टेम्पोचालकासह तीनजण जखमी झाले. 

याबाबतची माहिती अशी की, भाळवणीपासून नगरकडे जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराजवळील एस. के.आर. चौकात दुपारी तीनच्या सुमारास दैठणे गुंजाळ परिसरातील दूध घेऊन आळेफाट्याकडे जात असलेल्या एम.एच. १४ बी.जे. २९९६ या टँकरची व पारनेरहून भाळवणी मार्गे नगरकडे जात असलेल्या एम.एच. १६ ए.वाय.८४७१ या टेम्पोची जोराची धडक झाली. Loading...
यात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टेम्पोचालक बाळासाहेब लहू औटी, नामदेव औटी व खरमाळे फिटर हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. कल्याण -नगर -विशाखापट्टणम् हा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने वाहतुकीत मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, भाळवणी परिसरात लहान -मोठे अपघात होत आहेत.

त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्ते चांगले झाल्याने वाहनांचा वेग नियंत्रित होत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. गावानजीक संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदाराने ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.