केडगाव युवक खून प्रकरणातील आरोपीस अटक .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील युवक राहुल भागवत निमसे (वय ३२) याच्या खुनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमित बाबुराव खामकर (रा. केडगाव) याला शनिवारी (दि. ३०) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दि. ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

केडगाव येथील राहुल निमसे या युवकाचा त्याचा मित्र अमित खामकर यानेच पैशाच्या वादातून डोक्यात दगड घालून खून करुन मृतदेह केडगाव ते अरणगाव रस्त्यावर नेऊन टाकला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात राजू निमसे याच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 


Loading...
या प्रकरणातील आरोपी अमित खामकर याला नगर तालुका पोलिसांनी अटक कली. आरोपी अमित खामकर याला शनिवारी (दि. ३०) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ. एस. पी. नलगे यांचेसमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल ॲड. महाले यांनी युक्तीवाद केला. 

हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून आरोपी खामकरने खून केल्यानंतर मृतदेह अरणगाव शिवारात टाकून दिला. त्यामुळे हे काम एकट्याचे नसून आरोपीला आणखी कोणी साथीदार आहे का ? याचा तपास करावयाचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. 

आरोपीच्यावतीने ॲड. शशिकांत रकटे यांनी युक्तीवाद केला की आरोपी खामकर याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला दगड, चपला कपडे असा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपी खामकरला पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नाही दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी खामकर याला दि. ६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी दिली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.