श्रीगोंद्यात भाजप नगरसेवकासह दाेन भावांविरुद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुनील वाळके व त्यांच्या दोन भावां विरोधात ट्रकच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सुजित विजय शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली हाेती. वाळके बंधूंनी शिंदे यांचा विश्वास संपादन करुन त्यांना मालट्रक (महा.१२ एच .डी .६३९१) विकला. 


Loading...
या व्यवहारात १ लाख ६० हजार रूपये अॅडव्हान्स घेतले व उर्वरित रक्कम ट्रकवर कर्ज केल्यानंतर द्यायचे होते. मात्र, या ट्रकवर कर्ज मिळत नसल्याने फिर्यादीनी ट्रक परत केला. नंतर वाळकेंनी ट्रक दुसऱ्याला विकला. दरम्यान, शिंदे यांनी अॅडव्हान्स रक्कम परत मागितली असता त्यांना शिवीगाळ केली, धमकीही दिली. या प्रकरणी सुनील, राहुल व सचिन वाळकेंवर गुन्हा दाखल झाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.