पारनेरमध्ये तरुणावर कोयत्याने वार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील बायपास चौकातील हॉटेल शिवशंकरजवळ तीन हल्लेखोरांनी विनायक साहेबराव दशवंत (२५ वर्षे, टाकळी ढोकेश्वर) या तरुणावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोयत्याने वार केले. 

जखमी तरुणाला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला नगर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या संबधीची फिर्याद पोलिसात सायंकाळी उशिरापर्यंत दाखल झालेली नव्हती. 

Loading...

तरुणावर हल्ला करणारे मोटारसायकलीवरुन फरार झाले. दशवंत याच्या मानेवर खोलवर वार झाला आहे. तोंडाला मोठी जखम झाल्याने व ओठावर टाके पडल्याने बोलण्यास अडचण येत असल्याचे कॉन्स्टेबल संतोष शेळके यांनी सांगितले. 


जखमी तरुणाचा जबाब नोंदवल्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. या जखमी तरुणाचा टाकळी ढोकेश्वरमध्ये चायनीजचा व्यवसाय आहे. त्यामुळे हल्ला या व्यवसायातून की, अन्य कारणांनी झाला, याचा शोध पोलिस घेत आहेत. भरवस्तीत हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.