अकोल्यात जिल्हा परिषद शिक्षिकेची विहिरीत उडी मारून आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका शोभा शांताराम जाधव (वय ४५) या विवाहीत महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना अकोले येथे घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.अकोले शहरानजीक धामणगावआवारी रस्त्यालगत राहणाऱ्या या शिक्षिकेच्या घराजवळ रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत तिने उडी मारून आपली जीवन यात्रा संपविली आहे. 


Loading...
तालुक्यातील रूंभोडी-दत्तवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या सेवेत होत्या. सोमवारी (दि.९) सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना लक्षात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर ग्रामिण रुग्णालय अकोले येथे शवविच्छेदन करण्यात आले. अकोले येथे प्रवरा नदीतिरी स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांचे मागे अकोले दूरसंचारमध्ये सेवेत असणारे पती शांताराम जाधव यांच्यासह दोन मुले व एक सून असा परिवार आहे. अगस्ती कारखान्यातील कॅशिअर सुनील शेटे यांच्या त्या भगिनी आहेत. मयत शोभा यांच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नसून अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.