श्रीगोंदा शहरातील खड्डे बुजवण्यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहरातील रस्त्यांवर मोठ्या स्वरूपात खड्डे पडले असून, येत्या ११जुलै बुधवार पर्यंत हे खड्डे न बुजवल्यास शिवसेना नेते घनशाम शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक श्रीगोंदा नगरपरिषदेसमोर गुरुवार १२ जुलै रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती शिवसेना श्रीगोंदा तालुकाप्रमुख संजय आनंदकर यांनी दिली.

याबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, श्रीगोंदा नगरपरिषदेने शहरातून बाहेर जाणारे चार किमी लांबीपर्यंतचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरीत करून घेतले आहेत. त्या रस्त्यांवर आज मोठे खड्डे पडले असून, त्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. 

Loading...

या खड्डेमय रस्त्यांमुळे लोकांना मणक्याचे आजार होत आहेत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेने रस्ते स्वत:कडे हस्तांतरीत केल्यामुळे ते दुरुस्त करण्याची जबाबदारी नगरपरिषदेचीच असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगत आहे. 


त्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषदेने बुधवारपर्यंत शहरातून बाहेर जाणारे चार किमी लांबीपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करावी. खड्डे बुजवावेत दि. ११जुलै पर्यंत हे रस्ते दुरुस्त न केल्यास शिवसेना दि.१२ जुलै रोजी श्रीगोंदा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.