नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणला : गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील एक हजार किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून हजारो कोटींचा निधी आणला असून, प्रत्येक महामार्गावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. चार वर्षांत भरीव असा निधी केंद्र सरकारकडून मतदारसंघासाठी मिळाला असल्याची माहिती अहमदनगर महापालिकेचे गटनेते सुवेंद्र गांधी यांनी दिली. 

सातवड, ता. पाथर्डी येथे खा. दिलीप गांधी यांच्या जिल्हा नियोजन निधी अंतर्गत सातवड ते ढोलेश्वर देवस्थान रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. . या कामाचे भूमिपूजन सुवेंद्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. Loading...
या वेळी गांधी म्हणाले, शिवसेना मंत्र्यांच्या खिशातील राजीनामे प्लास्टिकचे असल्याने ते भिजणार नाहीत, अन् फाटणारदेखील नाहीत, आणखी दोन वर्षे ते खिशात शाबूत राहतील. संसारामध्ये भांड्याला भाडं लागतचं. त्याशिवाय प्रपंचाचा गाडा चालत नाही, असे म्हणत शिवसेना भाजपच्या वादविवादावरून कराळे यांना चिमटा काढला. 

या वेळी अनिल कराळे म्हणाले, दक्षिण मतदारसंघात खा. गांधी यांनी निश्चितच भरीव अशी विकासकामे केली असून, सेना भाजपच्या युतीदरम्यान खा. गांधी यांच्यासोबत ठामपणे राहण्याचे काम केले आहे. जातीवादाचं राजकरण आमच्या रक्तात नाही. 


प्रा. शशिकांत गाडे यांच्यासारख्या सुसंकृत नेत्याच्या मार्गदर्शनाखाली यापुढे गटाच्या विकासासाठी भरीव निधी आणणार असल्याचे कराळे म्हणाले. रोहिदास कर्डिले म्हणाले, मी कोणत्याच पक्षाचा नाही, सर्व पक्षांत माझे मित्र आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मित्रांकडे शब्द खर्च करतो. 


राजू पाठक, भैया पाठक यांच्या पाठपुराव्यामुळेच या रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला. वाढप्या कोणीही असो, सातवडकरांनी पोटभर जेवून घ्यायचं काम करावं, असे आवाहन कर्डिले यांनी केले. याप्रसंगी एकत्रित आलेल्या या जोडगोळीने एकमेकांना चांगल्याच कोपरखिळ्या मारल्याने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.