एकतर्फी प्रेमातून विद्यार्थ्याची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एकतर्फी प्रेमातून श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील स्वप्नील राजेंद्र होले (वय २०) या महाविद्यालयीन विद्याथ्र्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. 


Loading...
याबाबतची शहर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली माहिती अशी, मयत स्वप्नील होले हा गत वर्षी तिसऱ्या वर्षाला अनुत्तीर्ण झाला होता. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याबाबत त्याने सोशल मिडीयावर सदर मुलीच्या नावाने बनावट खाते उघडले होते. त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.