बनावट लग्नप्रकरणी आणखी चौघांची फसवणूक झाल्याचे उघड


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बनावट लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच टोळीने आणखी चार जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हे चार नवरदेव काल पोलिसांसमोर हजर झाले. 

शहराजवळील दत्तनगर येथे राहात असलेल्या जाकीर ऊर्फ बाळासाहेब बबन पठारे याला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे तपास केला असता त्याने फसवलेल्या आणखी चार जणांची नावे समोर आली होती. हे चार नवरदेव काल पोलिसांसमोर हजर झाले.या टोळीने आपल्याकडून हजारो रुपये उकळल्याचे त्यांनी सांगितले. 

Loading...

या सर्वांकडून या टोळीने प्रत्येकी ५० हजार रुपये उकळले. धुळे जिल्ह्यातील काही जणांनाही फसवल्याची माहिती उपअधीक्षक वाघचौरे यांनी सांगितली. याप्रकरणातील बनावट नवरी प्रियंका प्रकाश रोकडे व अनिता प्रकाश रोकडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.


या टोळीतील बनावट नवरी प्रियंका ही वेगवेगळ्या नावाने या तरुणांना भेटली होती. घराचा पत्ताही वेगवेगळा दिला आहे. फसवण्यात आलेल्या आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


शेतकरी कुटुंबातील लग्न जमत नसलेल्या तरुणांच्या विवंचनेचा या टोळीने गैरफायदा उचलला. या माध्यमातून पैसे कमविण्याचा गोरख धंदा इतके दिवस सुरू होता. फसवणूक करायची, धमकवायचे आणि या माध्यमातून पैसे उकळायचे नंतर पसार होत दुसरे सावज शोधायचे अशी या टोळीची गुन्हा करण्याची कार्यपध्दती होती.----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.