दोन दिवस अतिवृष्टी, गोदावरी व भीमा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारतीय हवामान खात्याने दि. १६ ते १८ जुलै या काळात उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सरासरी १९२. ९१ मि. मी. पाऊस झाला आहे. गोदावरी नदीत नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे. 


तसेच भीमा नदीस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. . अहमदनगर तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यात पावसामुळे किंवा धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी, भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Loading...
त्यामुळे स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे, सखल भागातील नागरिकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, तसे पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे, पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी, वेळीच सुरक्षीतस्थळी स्थलांतर करावे, घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे, धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.