अहमदनगरमध्ये भाजपच्या नगरसेवकाकडून विजचोरी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महावितरणने वीज चोरांविरोधात सुरु केलेल्या कारवाईमध्ये महापालिकेतील भाजप नगरसेवक महेश रघुनाथ तवले हे वीजचोर म्हणून आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून वीजचोरी केली जात होती तब्बल 2 हजार 340 युनिटची वीजचोरी केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महावितरण कंपनीच्या फकीरवाडा विभागाचे सहाय्यक अभियंता रमाकांत भागचंद गर्जे यांनी दि. 29 मे रोजी तवलेनगर येथील नगरसेवक महेश रघुनाथ तवले यांच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी छाप्यात तवले यांच्या घरात वीजचोरी केली असल्याचे आढळून आले.

Loading...
2 हजार 340 युनिट वीज फुकट वापरून त्या माध्यमातून 32 हजार 560 रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. सदर गुन्ह्यात तडजोड आकार म्हणून 6 हजार रुपये आकारण्यात आले. याप्रकरणी गर्जे यांच्या फिर्यादीवरुन महेश तवले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.