हिम्मत असेल तर धुरपते यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादीच्या भाळवणी गणाच्या पंचायत समिती सदस्या व त्यांच्या बंडखोर पतीकडून विकासकामे न करता लोकांची दिशाभूल सुरू आहे. ग्रामस्थ या पदलासेला कंटाळले असून हिम्मत असेल तर पंचायत समिती सदस्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवा, कोण कोणामुळे निवडून आले हे जनतेला समजेल, अशी घणाघाती टिका भाजपाचे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे यांनी केली आहे. 

Loading...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु भाळवणी गणाचे पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते व त्यांचे पती राष्ट्रवादीचे बंडखोर सुरेश धुरपते यांनी गणात एकही दर्जेदार काम केले नाही. 

गणात धुरपते यांच्याकडून पंचायत समितीच्या स्थानिक विकास निधीतून विकासकामे झालेले नाहीत. पदलालसा व मोठेपणाला हापापलेल्या सदस्या पतीकडून दीड वर्षांत फक्त पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांवर टिका करण्याचे काम केले. या राजकारणाला जनता वैतागली असून हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत निवडून येऊन दाखवा, असा सज्जड इशारा नरसाळे यांनी दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.