राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात बिबट्यांचे दिवसा दर्शन सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. घेरुमाळ वस्ती येथे सायंकाळी ६ वाजता किराणा दुकानासमोर बसलेल्या तरुणांनी दोन बिबिटे बाबासाहेब बानकर यांचा उसाच्या शेतातून बाहेर पडत असल्याचे पाहिले. 

यादरम्यान त्यांनी आरडा ओरड करताच बिबट्यांनी रस्ता ओलांडून रमेश वने यांच्या उसाच्या शेतात पलायन केले. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे शेतात रात्री पाणी पाहण्यासाठी जावे लागते. अनेकजण रात्री उकड्यामुळे बाहेर झोपतात. बिबट्यांचा पुन्हा परिसरात संचार सुरु झाल्याने मोठी भीती निर्माण झाली आहे.

Loading...
यापूर्वी घेरूमाळ वस्तीवर शेळ्या, कालवडी व अनेक कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.जनावरांना चारा आणण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ लक्ष घालावे. आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.