पालकमंत्री राम शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादिवशी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ.इंद्रकुमार भिसे यांच्यासह १६ कार्यकर्ते आरक्षणाचा हक्क मागत होतो. त्यावेळी झालेल्या गोंधळास आम्ही जसे जबाबदार आहोत.  त्याचप्रमाणे आयोजक पालकमंत्री राम शिंदे जबाबदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ.इंद्रकुमार भिसे यांनी केली आहे. 

Loading...
यासाठी भिसे यांच्यासह १६ कार्यकर्त्यांनी जेलमध्ये गुरुवारपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.. न्यायालयीन कोठडीत डॉ. भिसे यांनी उपोषण सुरू केले आहे. सबजेलर राजेंद्र माने यांनी या उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले नाही.

तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना माहिती कळवली आहे. डॉ. भिसे यांच्या वतीने तहसीलदार यांच्याशी विशाल नाईकवाडी यांच्याशी बाजीराव गावडे, सुरेश भाऊ कांबळे, पांडुरंग मेरघळ, बाळासाहेब कोळेकर, डॉ. शिवाजी देवकाते, विलास देवकाते आदी चर्चा करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.