बँकेतून पैसे काढून वृद्धेची फसवणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासे गावात एकटी राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेचे मंजूर घरकुलाचे आलेले पैसे गावातीलच व्यक्तीने महिलेला फसवून बँकेतून काढून घेतल्याची तक्रार महिलेच्या मुलाने नेवासे पोलिस स्टेशनला दिली आहे. 


पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुरेगाव गंगा येथील मच्छिंद्र बर्डे याने म्हटले आहे की, त्याची आई गयाबाई बर्डे हिस घरकुल मंजूर झाले होते. त्यातील पहिला हप्ता २५ हजार आईच्या नावावर सेन्ट्रल बँक नेवासे येथे जमा होता. गावातील अशोक मनोहर शिंदे व छाया नवधर यांनी त्याच्या आईला नेवाशाला घेऊन गेले व १३ मार्चला त्यांनी ५ हजार रुपये काढले व आईला २ हजार देऊन ३ हजार ठेवून घेतले.

Loading...
त्यानंतर पुन्हा १५ मार्च रोजी परत या दोघांनी आईला नेवाशाला घेऊन गेले व २५ हजार रुपये काढले व परत आईला फक्त २ हजार देऊन २३ हजार रुपये खर्च केले. अशिक्षित असल्याचा फायदा घेत दोघांनी पैसे काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.