...तर मनपाचे अहमदनगर 'महानरक' पालिकेत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्ताची गरज आहे. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी कामांना प्राधान्य देऊन महापालिकेचा गाडा चालवित आहे. शहराची बदलती परिस्थिती पाहता महापालिकेला पूर्णवेळ आयुक्ताची गरज आहेत. मुख्यमंत्री यांनी नगर शहराची परिस्थिती लक्षात घेऊन पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी जनहित विकास संस्थेने केली आहे. 

संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विनोद काकडे यांनी यासंदर्भात पत्र दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही संस्थेचे कर्मचारी, अधिकारी व जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी (नगरसेवक सभासद) यांनी मिळून लोकाभिमुख, लोकोपयोगी व पारदर्शी प्रशासकीय कामकाज करणे अभिप्रेत असते.

या संस्थेवर नियंत्रणासाठी शासनाने प्रशासक म्हणून आयुक्तपद निर्माण केलेले आहे. आयुक्तपदी नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांवर शासनाचा, तसेच स्थानिक प्राधिकरणाचा (एकूणच जनतेचा) फार मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो.

अहमदनगर महानगरपालिका स्थापनेपासून ते आजपर्यंत सदर आयुक्तपदास न्याय देणारा अधिकारी आजपर्यंत अहमदनगर महानगरपालिकेला मिळालाच नाही. महानगरपालिका स्थापन होऊन १२ वर्षे झाली आहेत. सुमारे ७५ करोड रुपये वार्षिक बजेटणे सुरुवात होऊन, ती ६०० करोड वार्षिक बजेटपर्यंत येऊ टेकला आहे.

म्हणजेच आजपर्यंत अहमदनगर महानगरपालिकेने नगर शहरात विकास कामांसाठी अंदाजे २५०० करोड रुपये खर्च केले आहेत. परंतु दुर्दैवाने नगर शहरात कुठल्याही प्रकारचे पक्के व कायम स्वरुपाचे काम नाही.

Loading...
त्यात सार्वज़निक शाळा, हॉस्पिटल, उद्याने, जलतरण तलाव, रस्ते, वाहतूक, बससेवा आदींचा समावेश करता येईल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा पैशाचा चुराडा होवून सुध्दा नगरचा विकासच झाला नाही याउलट नगर शहर हे भकास झाले आहे.

नगरमधील काही भ्रष्ट राजकीय पुढारी व महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी यांचेकडून हिच अपेक्षा असते. परंतु सदर चुकीच्या कामकाजावर नियंत्रण व अंकुश ठेवण्यासाठी शासनाने प्रशासक म्हणून आयुक्त या पदावर पाठवलेल्या अधिकाऱ्याने अंकुश ठेवणे अभिप्रेत असताना आजपर्यंत सदर पदावर आलेल्या बहुतेक (तुरळक अपवाद वगळता) काहीच केले नाही, उलट काहीजण त्यात सामील होते, की काय असा संशय जनतेच्या मनात येत असल्याची कैफियत निवेदनात काकडे यांनी मांडली आहे

अहमदनगर 'महानरक' पालिकेत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही 
आयुक्तपदी चांगल्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक होणे ही नगरकरांची गरज आहे. महानगरपालिका स्थापन झालेपासून अकार्यक्षम आयुक्त लाभण्याची सुरू असलेली परंपरा, इथून पुढेही सुरू राहिल्यास महापालिकेचे अहमदनगर 'महानरक' पालिकेत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही - विनोद काकडे, . अध्यक्ष, जनहित विकास संस्था.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.